आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार 13 सप्टेंबर 2020 रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये कोणतेही शुभ काम वर्ज्य आहे. आजचा दिवस 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या सहा राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नोकरी आणि बिझनेसमध्ये कामे अडकू शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
मेष: शुभ रंग : मरून | अंक : ३
आज काही रेंगाळलेल्या घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. दिवसभरात एखादी सुवार्ता कानी येईल.
वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : १
आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असून तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. साहीत्यिक मंडळींकडून उत्तम लिखाण होईल.
मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. काही प्रिय पाहुण्यांची घरी उठबस राहील. नाती सांभाळायची असतील तर खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे गरजेचे.
कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
कंजूषपणा सोडून अत्यावश्यक कारणांसाठी खर्च करावाच लागणार आहे. दूरचे नातलग संपर्कात येतील.
सिंह :शुभ रंग : जांभळा|अंक : ३
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल.जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.
कन्या : शुभ रंग : पांढरा|अंक : १
आज तुम्ही सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. आज मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.
तूळ : शुभ रंग : निळा|अंक : ४
सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. आज जिवलग मित्रांमधेही काही मतभेद संभवतात.
वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ५
नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल.
धनु : शुभ रंग : सोनेरी|अंक : ६
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागेल. वैवाहीक जिवनांत जोडीदाराची मते विचारात घ्या.
मकर : शुभ रंग : चंदेरी|अंक : ८
नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.
कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
पैशाची उधळपट्टी थांबवणे अत्यंत गरजेचे आहे.रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल.
मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.