आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवार, 14 मार्च 2021 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. रविवारी उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...
मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : १
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. कष्टांचे चीज होईल.
वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
अधिकारांचा वापर जपून करा. अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतक दुखावण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.
मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनतीनंतरच अाज यशाची चाहूल लागेल. ज्येष्ठ मंडळींना सत्संगाची ओढ लागेल.
कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.
सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ५
व्यवसायात भागीदारांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावासा वाटेल.
कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ८
नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील.ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.
तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. जिवाची मुंबई कराल.
वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.
धनू : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
आज घराबाहेर रागीट स्वभावावर नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवणार आहे.
मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : १
पैशाची कमतरता जाणवणार नाही. आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल.
कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ३
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कामी याल. आज गरजेपुरतेच बोला.
मीन : शुभ रंग : भगवा| अंक : ८
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक माघार घेतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.