आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 15 मे रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. आज आशादायी दिवस.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
नोकरीच्या ठीकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. साहेबांना आज गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला होकार मिळेल.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
कार्यालयिन कामासाठी प्रवास घडतील. आज अपेक्षित मेल्स येतील. प्रापर्टी विषयक व्यवहार आज नकोत.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, तुम्ही लक्षच देऊ नका.

तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
नोकरी धंद्याच्या ठीकाणी अहंकारास थारा देऊ नका. मृदु वाणीनेच अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आज घरात थोरांशी मतभेद संभवतात,फार ताणू नका.दूरच्या प्रवासात आज मौल्यवान ऐवज सांभाळा.

धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : १
नोकरीधंद्यात अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. काही अपेक्षित लाभ होतील.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ५
उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची कृपा राहील.

कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तराही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज दैवाची साथ निश्चित.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठया आर्थिक उलाढाली आज टाळा.

बातम्या आणखी आहेत...