आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार 15 नोव्हेंबर 2020 ला विशाखा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ८
हौसमौज जरूर करा, पण आपल्या मर्यादा सांभाळा.कुसंगतीपासून लांबच राहा. वाहन चालवताना जपून.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडीक रुसवेफुगवे असतील.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावण्याची शक्यता अाहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. रुग्ण ठणठणीत बरे होतील.
सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल.कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत.
कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज स्थावरच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे.
तूळ : शुभ रंग : लाल|अंक : ५
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. कमी बोला.
वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. वाद टाळावेत.
धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
रिकामटेकड्या चर्चेत वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. दिवाळीसाठी खरेदी कराल.
मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.
कुंभ : शुभ रंग : निळा|अंक : ३
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू राहील.मित्रांपासून दोन हात लांब राहा.
मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.