आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 16 ऑगस्टला आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत असून हा योग सकाळी 7 वाजून 53 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर सिद्धी नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच सिद्धी नावाचा योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांचे उत्पन्नही वाढेल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : १
तुमच्या खर्चीक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. शेजारी प्रेमाने डोकावतील.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
अनपेक्षितपणे धनप्राप्ती होईल. पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले अाप्तस्वकीय जवळ येतील.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ८
मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील उत्साह समोरच्यास प्रभावित करेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने अनेक किचकट प्रश्नही सहजपणे सोडवाल.

कर्क : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळावा. कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील.

सिंह : शुभ रंग : केशरी|अंक : ७
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
कार्यक्षेत्रात कामाचे प्रमाण वाढले तरी विरोधकांचा जोर कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

तूळ : शुभ रंग : मोरपिशी|अंक : ४
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही. आज देव नवसाला पावणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
दैनंदिन कामात अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडू शकेल.

धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : २
नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील. सज्जनांचा सहवास घडेल.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
कामे वेळीच पार पडतील. आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. परिवारात सामंजस्य राहील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. गृहिणींचे गृहोद्योग तेजीत चालणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...