आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 16 मे रोजी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. भावनेच्या भरात दिलेले शब्द आज पाळावे लागणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ८
आधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रागावून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : ७
बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. कामातील निष्ठा वरिष्ठांना प्रभावित करेल.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ६
भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी काही मतभेद होतील.

धनु : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
नोकरीत अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी मिळून मिसळून रहा.

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
काही जुनी दुखणी डोकं वर काढतील. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल. येणी वसूल होतील.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५
नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील. नवोदीत कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...