आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 17 जानेवारी रोजी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार..

मेष: शुभ रंग: भगवा| अंक : ७
मनसोक्त खर्च करा. आज पैशाची कमतरता भासणार नाही. काहीजण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेतील. संध्याकाळी जोडीदार आतुरतेने वाट पाहील.

वृषभ: शुभ रंग: राखाडी| अंक : ९
कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबासाठीही वेळ काढणे अवश्यक राहील.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
नोकरदारांना वरीष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. कार्यक्षेत्रात पूर्वीचे कष्ट कारणी लागतील.

कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
कुसंगतीपासून लांबच रहा. नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे.

सिंह :शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
कार्यक्षेत्रातील काही बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
नोकरीत वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. शत्रू मित्रांमध्येच लपले असतील. सतर्क रहा.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील.

वृश्चिक : शुभ रंग : मरून| अंक : २
आज खर्चाचे विविध मार्ग खुणावतील. गृहीणींना विविध जाहीराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

धनु : शुभ रंग : केशरी| अंक : १
कुटुंबियांच्या गरजा वाढत्या असतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होईल.प्रॉपर्टीच्या व्यवहारात सतर्क रहा.

मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
इतरांचे विचार पटणार नाहीत. अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. सडेतोड बोलल्याने नाती दुरावतील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
रिकामटेकडया वादविवादात बराच वेळ फुकट जाईल. महत्वाची कामे दुर्लक्षित होतील. कृतीस प्राधान्य द्या.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज नोकरीत वरीष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

बातम्या आणखी आहेत...