आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 19 जून रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. रविवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभाची शक्यता. आशादायी दिवस.

वृषभ : शुभ रंग : लाल| अंक : ६
आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
आज नविन व्यवसायात कुवतीबाहेर आर्थिक धाडस नको. हितशत्रू संधीच शोधत आहेत सतर्क असावे.

सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ६
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधून घ्यावा.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

बातम्या आणखी आहेत...