आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात

रविवार 17 मे रोजी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती विषकुंभ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा योग पुर्ण दिवस राहिल. याचा परिणाम सर्व राशींवर राहणार आहे. यामुळे लोकांचा मूड खराब होईल आणि चिडचिड होईल. यासोबतच कामे वेळेवर पुर्ण होणार नाही. राशीनुसार लोक कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतील. याव्यतिरिक्त काही राशींवर अन्य ग्रहांचा मिळता जुळता परिणाम राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : सोनेरी | अंक : १

आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

कर्क :  शुभ रंग : केशरी | अंक : २

कर्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ३

उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.  नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनू :  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : ३

अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १

अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २

आज तुम्हाला संयमाची गरज असून अती उत्साहाच्या  घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे.

बातम्या आणखी आहेत...