आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 18 एप्रिल रोजी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीत बढतीबरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यांनी प्रयत्न वाढवायला हवेत. यश सोपे नाही.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : २
तुमच्या वागण्यात इरांना हट्टीपणा जाणवेल. स्वत:चेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्याकडून आज काही आपलीच माणसे दुखावली जातील.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. स्पष्ट बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ७
आज भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येये साध्य होतील.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग यशस्वीरीत्या सोडवाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ६
आज काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका.

धनू : शुभ रंग : भगवा|अंक : ५
आज धंद्यातील आवक-जावक सेम सेमच राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने सुखावतील.

मकर : शुभ रंग : चंदेरी|अंक : २
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे. रुग्णांनी पथ्य पाळावे.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ४
पारिवारिक सुखात वृद्धीच होईल. वाहन, वास्तूविषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

मीन : शुभ रंग : पांढरा|अंक : ३
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरुणांनी गैरवर्तन टाळावे.

बातम्या आणखी आहेत...