आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 18 जुलै रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी असेल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
आज नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. अति आक्रमकतेने नुकसान होऊ शकते.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. चैन कराल.

कर्क : शुभ रंग : निळा| अंक : ८
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आवक उत्तम.

सिंह : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणींना आज शेजारधर्म पाळावे लागतील.

कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
आवक पुरेशी असली तरी आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. उद्धटपणास लगाम असावा.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
अधिकारांचा गैरवापर टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : ८
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आज दिवस योग्य.
मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी आज वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कुंभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

बातम्या आणखी आहेत...