आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 18 ऑक्टोबर 2020 रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : निळा| अंक : ३
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचे सल्ले फारच उपयुक्त ठरणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : मोरपिशी| अंक : २
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : स्ट्राॅबेरी|अंक : १
घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवोदित कलाकारांना संधी चालून येतील.

कर्क : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात.

कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आज रिकाम्या गप्पा टाळा. कारण, त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींची झाकली मूठ झाकलीच ठेवावी.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : ७
वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
फोन व लाइट बिले भराल. काही देणीही चुकवावी लागतील. हौसमौज करण्यावर थोडी मर्यादा येईल.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र हिताचे सल्ले देतील.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ८
वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

कुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ८
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. देवही नवसास पावेल.

मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ६
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करूच नका. शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.