आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खास

रविवार, 19 एप्रिल 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. रविवारी पूर्व भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : ३

आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

  • वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल.

  • मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. दूरावलेल्या नात्यांतील गैरसमज दूर होतील. 

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल.अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रागाऊन निघून  गेलेल्या  व्यक्ती  दुपारनंतर घरी परत येतील. 

  • सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ६

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते. 

  • कन्या : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. 

  • तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

                                  

  • वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहीक जिवनांत जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

  • धनू : शुभ रंग : केशरी | अंक : १

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराशी दुपारनंतर एकमत राहील.

  • कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ७

आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीची ओढ लागेल. 

  • मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील. 

0