आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विषकुंभ नावाच्या अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात
Advertisement
Advertisement

रविवार, 2 ऑगस्ट रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. रविवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : १
अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

वृषभ: शुभ रंग : मोरपिशी | अंक : ८
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. अनुभवी व्यक्तींनी दिलेले सल्ले गांभिर्याने घ्यावेत.

मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ८
आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ४
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी सामंजस्याने घेतलेले बरे.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७
कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळींना नव्या संधी चालून येतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : २
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमधे सामंजस्य राहील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आईचे मन मोडू नका.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. बचतीस प्राधान्य देणे गरजेचे.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. हरवलेले गवसेल.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. खर्च वाढेल.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करू शकाल. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

Advertisement
0