आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 2 जानेवारी 2022 रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मासन्मानात वृध्दी होईल. उत्तम दिवस.

वृषभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
जे कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका. घाइगर्दीत घेतलेले निर्णय आज चुकण्याचीच शक्यता आहे.

मिथुन : शुभ रंग : केशरी| अंक : ३
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धाऊन येतील.

कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ८
तुमचा आत्मविश्वास व मनोबल चांगले असेल. महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर कलेले बरे.

सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : १
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. सकाळी वजनदार असलेले खिसे आज संध्याकाळी रिकामे होतील.

कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरूणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गृहीणी व्यस्त.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची आवकही पुरेशी राहील.

धनु : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.

मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : २
व्यवसायात अर्थप्राप्ती वाढेल. काही जुनी येणी आज अनेक्षितपणे वसूल होतील. मित्र शब्द पाळतील.

बातम्या आणखी आहेत...