आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार 20 डिसेंबर रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यितिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणार राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...
मेष: शुभ रंग : निळा | अंक : २
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्रात अधिकारात वृध्दी होईल. संध्याकाळी करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. अनपेक्षित लाभ होईल.
वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ९
अनावश्यक खर्चात कपात करून बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी काही मोठे खर्च उद्भवतील. अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे.
मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
काही मनाविरूध्द घटना घडतील. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. आज तुमचा देवधर्माकडे कल राहील. विश्रांतीची गरज भासेल.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील.
सिंह : शुभ रंग : माेरपंखी | अंक : ७
कोणतीही गोष्ट सहज साध्य होईल या भ्रमात राहू नका.ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी गोडीगुलाबी राहील.
कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ५
काही महत्वाची कामे असतील तर आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्यावीत. आज वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेफार मतभेद संभवतात. शांत रहा.
तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८
आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
नोकरी व्यवसायात आज उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. काही येणी वसूल होतील. प्रेमवीरांनी संध्याकाळी न भेटलेलेच बरे.
धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व. विद्यार्थ्याना अभ्यासाचे ओझे वाटेल.
मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २
महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. आज काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. वाद टाळलेले बरे.
कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ४
नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने मनावर घेऊ नका. महत्वाच्या कामासाठी भ्रमंती होईल.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
आज आर्थिक अडचण दुपारनंतर अकस्मिकरीत्या दूर होईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. आप्तस्वकीय तुमच्याशी जवळीक साधतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.