आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 20 जूनचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
भावंडांत झालेले काही गैरसमज दूर होतील. आज महत्त्वाच्या कामासाठी वणवण होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : २
मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. आनंदी दिवस.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ५
उच्च शिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
अथक श्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
उद्योग-व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

कन्या : शुभ रंग : लाल| अंक : ४
काही कारणाने घरात थोरांशी मतभेद होतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम|अंक : ८
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काबाडकष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होतील.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. अपुरी स्वप्ने साकार होतील.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ४
आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
आज तुम्हाला संयमाची गरज. अति उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत राहावे.

मीन : शुभ रंग : चंदेरी|अंक : ८
आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

बातम्या आणखी आहेत...