आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 20 नोव्हेंबर रोजी हस्त नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. कामामधील अडचणी दूर होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग: क्रिम, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामातील समर्पणाने वरिष्ठ प्रभावित होतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको. काही येणी असतील तर मागावी लागतील.

वृषभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : १
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.

मिथुन | शुभ रंग: निळा, शुभ अंक : १
व्यापार-उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावराची खरेदी-विक्री फायद्याची. घर सजावटीस प्राधान्य द्याल.

कर्क | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानीस कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

सिंह | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : २
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवला तरीही पैशाची उणीव भासणार नाही. दंतवैद्याची भेट घ्यावी लागेल.

कन्या | शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

तूळ | शुभ रंग :स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
आजचा दिवस उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.ज्येष्ठांना मन:शांतीसाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.

वृश्चिक | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ६
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकारयोग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठा भाऊ आज योग्य सल्ले दईल.

धनु | शुभ अंक : ९, शुभ रंग: सोनेरी
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.

मकर | शुभ रंग :निळा, शुभ अंक : ५
कार्यक्षेत्रात डोक्यास ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा. फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.

कुंभ | शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ८
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. सामान्य दिवस.

मीन | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ४
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदारीत देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.

बातम्या आणखी आहेत...