आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार 21 जूनला मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. रविवारच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार..
मेष: शुभ रंग : चंदेरी | अंक : १
काही जणांना अचानक प्रवासास निघावे लागेल. प्रवासात झालेल्या ओळखी भविष्यात फायद्याच्या ठरणार आहेत.
वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ४
खर्च वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध जुळून येतील. आज शब्द हे शस्त्र आहे याचे मात्र भान ठेवावे लागणार आहे.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
आज तुम्हाला हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा मोह होईल, पण तसे करू नका. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
दिवस खर्चाचा आहे, बचतीचा विचारच सोडून द्या.काही दूरचे नातलग अचानक संपर्कात येणार आहेत.
सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस असून तुमच्या काही मनोकामनांची पूर्तता होणार आहे. छान दिवस.
कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे पालन गरजेचे आहे. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात रहाल.
तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
आज घरात वडीलधारी मंडळी काहीशी हट्टीपणाने वागतील. वादविवाद टाळून त्यांच्या वयाचा मान राखाल.
वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वाहन चालवताना फारच जपून.
धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.
मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
व्यवसायात वाढती स्पर्धा बेचैन करेल. आज वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल.
कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
स्थावरासंबंधी काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांकडून आज कौतुकास्पद कामगिरी होईल.
मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ४
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. आईचे मन मोडू नका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.