आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार, 21 मार्च रोजी मृशशीर्ष नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे रविवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : २
आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास कराल.
वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : १
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहिणींना उसंत नाही. काही क्षुल्लक कारणाने शेजारी रुसून बसतील.
मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : ३
अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा असू द्या. इतरांचीही मते ऐकून घेण्याची तयारी ठेवा.
कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.
सिंह : शुभ रंग : केशरी|अंक : ४
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.
तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला एकांत हवासा वाटेल.
वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. प्रतिष्ठेस जपा.
धनू : शुभ रंग : पांढरा|अंक : ९
वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण. काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आज सहकुटुंब चैन कराल.
मकर : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे. व्यसने टाळा.
कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : ८
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.
मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. कलाकारांनी स्ट्रगल वाढवावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.