आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 23 मे रोजी हस्त नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : मरून | अंक : १
कोणतीही गोष्ट सहज साध्य झाली नाही तरी प्रयत्नांना दैव साथ देईल. आज शब्दांचा वापर जपूनच करा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेला पैसा जपून वापरा. महत्त्वाच्या कामास विलंब होईल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : २
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. कलेच्या क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. जमीन जुमल्याच्या व्यवहारात सावध रहावे लागेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
आज अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही अनेक मार्ग खुणावतील.

कन्या : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ७
आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. खूप खर्च कराल.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
रिकामटेकड्या चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल.आज एखाद्या गरजूस तुम्ही मदत कराल.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये आज शब्दास मान राहील.
धनु : शुभ रंग : केशरी | अंक : ५
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू राहील. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : २
काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८
इतरांच्या भानगडीत न डोकावता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे राहील.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
कार्यक्षेत्रात आज प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज पती पत्नीत सामंजस्य राहील.

बातम्या आणखी आहेत...