आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 24 जानेवारी 2021 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. रविवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अति काही आवश्यक खर्च उद्भवणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज स्वत:साठी उंची वस्त्र खरेदी कराल. आधुनिक राहणीमानाकडे कल राहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

मिथुन : शुभ रंग : लेमन|अंक : ५
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. घरात थोरांशी काही मतभेद होतील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीचे मार्ग सोपे होतील. कष्टांची दखल घेतली जाईल.

सिंह : शुभ रंग : पांढरा|अंक : ५
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाद टाळा.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. सरकार दरबारी रखडलेल्या कामांना वशिला लावावा लागेल.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ६
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. कष्ट कारणी लागतील.

मकर : शुभ रंग : चंदेरी|अंक : २
घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहिक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
व्यावसायिक उलाढाल वाढेल. मीच म्हणेन ती पूर्व अशा थाटात वागाल. वादविवादात सरशी होईल.

मीन : शुभ रंग : राखाडी| अंक : १
आज एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

बातम्या आणखी आहेत...