आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 25 जुलै रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती आयुष्मान नावाचा खास योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे रविवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
विरोधक सक्रिय असताना कामात चुका नकोत. कुणाकडून अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : २
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
हट्टी स्वभाव काबूत ठेवा. कार्यक्षेत्रात आज काही प्रश्न सामंजस्याने सोडवावे लागणार आहेत.

तूळ : शुभ रंग : मरून|अंक : ६
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

वृश्चिक : शुभ रंग : नारिंगी|अंक : ९
ऑफिस कामासाठी प्रवास घडतील. प्रवासातील काही ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायद्यात.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ८
आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.शिक्षणाशी निगडित व्यवसाय तेजीत चालणार आहेत.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
नोकरदारांना काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा. कारण, जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे अहे.

मीन : शुभ रंग : निळा|अंक : ६
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

बातम्या आणखी आहेत...