आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्ध नावाच्या शुभ योगामध्ये सुरु होत आहे दिवसाची सुरुवात

रविवार 26 जुलै हस्त नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. रविवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : १
संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलिंगसारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. शेजारी सलोखा राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज अनपेक्षित लाभ होतील.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : २
बचतीचा विचार आज सोडूनच द्या. कंजूषपणा बाजूला ठेवून काही आवश्यक खर्च करावेच लागणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.

धनू : शुभ रंग : मरून | अंक : ४
कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली आश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

मकर : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक :१
आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक :३
तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.जोडीदाराशी एकमत.