आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 27 डिसेंबर रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : चंदेरी| अंक : ८
मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. छान दिवस.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकीनऊ येतील. व्यग्र दिवस.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
कार्यक्षेत्रातील बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवेफुगवे असतील.

सिंह : शुभ रंग : मरून|अंक : ८
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. पायपीट होईल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ६
महत्त्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालू राहील. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला, क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढवावेत.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
जमीनजुमल्याच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : १
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढणार आहेत. पथ्यपाणी पाळा, अन्यथा आजार बळावेल.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. वादविवाद मात्र टाळा.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
रिकाम्या चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. तब्येत नरमच राहील.

मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
आज एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल. चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. आज बचत शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...