आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 27 सप्टेंबर रोजी चंद्र मकर राशीमध्ये शनिसोबत राहील. यासोबतच चंद्रावर राहूची नववी दृष्टीही राहील. यामुळे चंद्र पीडित राहील. अशा ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. मनाविरुद्ध काही गोष्टी घडू शकतात. एखाद्या कामामुळे तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
आपले ध्येय सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या अथक प्रयत्नांस यश निश्चित.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ३
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : २
हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहिक जीवनात स्वत:च्या चुका शोधणे हिताचे.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
वैवाहिक जीवनात असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटतील. भागीदार योग्यच सल्ले देतील.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडाल. व्यग्र राहाल.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया|अंक : ६
घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. सावध राहा.

धनु : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येईल.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : १
अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही योग्य माणसे संपर्कात येतील.

कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ४
आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. आज इच्छापूर्तीचा दिवस.

बातम्या आणखी आहेत...