आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील सुटीचा दिवस रविवार

रविवार, 28 जून रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६

कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी काही क्षुल्लक मतभेद होतील. तडजोडीची भूमिका घेणे हिताचे. येणी वसूल होतील.

वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

कला व क्रिडा क्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींचे कष्ट कारणी लगतील. बुध्दीमत्तेस वाव मिळेल. ज्येष्ठांचे आरोग्य उत्तम राहील. गृहीणी स्वत:साठी वेळ देतील.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ७

प्रापंचिक समस्या सुटतील. आज काही शुभ वर्तमान कानी येईल. मातेकडून लाभ संभवतात. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी करू शकाल.

कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९

कार्यक्षेत्रात विरोधकांचा सामना करावा लागेल. आज गोड बोलूनच स्वार्थ साधून घेणे गरजेचे राहील.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

कार्यक्षेत्रात मनाजोगत्या घटनांनी तुमचा आत्मविश्वास वाढेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य द्या.

कन्या : शुभ रंग : डाळींबी | अंक : ८

तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा राहील. कायदा पाळावा.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ४

कार्यक्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. दिवस लाभाचा अाहे. आज म्हणाल ती पूर्व करू शकाल.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

कार्यक्षेत्रात अथक प्रयत्नानेच यशाच्या थोडेफर जवळ जाता येईल. निव्वळ स्वप्नरंजनापेक्षा कृती महत्वाची.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ३

दैनंदीन कामात काही अडचणी येतील. कार्यक्षेत्रात विरोधक वाढले असले तरी दैव तुमच्या बाजूने आहे.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. ताकही फूंकून प्या.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : १

उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयक बोलणी आज उरकून घ्या.

बातम्या आणखी आहेत...