आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 29 नोव्हेंबरचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : २
आज तुम्हाला संयमाची गरज. अति उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत राहावे.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ५
आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. अपुरी स्वप्ने साकार होतील.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
उद्योग-व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

कन्या : शुभ रंग : लाल| अंक : ४
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
काही कारणाने घरात थोरांशी मतभेद होतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम|अंक : ८
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काबाडकष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होतील.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
अथक श्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ४
उच्च शिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ५
मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. आनंदी दिवस.

मीन : शुभ रंग : चंदेरी|अंक : ८
भावंडांत झालेले काही गैरसमज दूर होतील. आज महत्त्वाच्या कामासाठी वणवण होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser