आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवार 3 एप्रिल रोजी पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.
एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी नमते घ्यावे. कुटुंबातील सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल.वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.
आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द जपून वापरणे गरजेचे आहे.
आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. ववाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.
कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.
आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. नवीन ओळखीत पैशाचे व्यवहार नकोत. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या. प्रतिष्ठेस जपावे.
अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.