आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 30 ऑगस्ट रोजी उत्तराषाढा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर रविवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : जांभळा | अंक : ५
महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील.

वृषभ: शुभ रंग : मोरपिशी | अंक : २
केवळ माठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. आधी आपल्या उन्नत्तीवर लक्ष केंद्रीत करा.

मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
नोकरीच्या ठीकाणी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणे हिताचे. वरीष्ठांच्या शब्दास मान देणे गरजेचे.

सिंह :शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. वैवाहीक जिवनात गोडवा राहील.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
कौटुंबिक जिवन सुखी समाधानी असेल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईचे मन दुखाऊ नका.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ६
व्यवसायात कष्ट कारणी लागतील. काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
अावश्यक खर्च हात जोडून उभे असतील. एखादी सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल असेल.

धनु : शुभ रंग : तांबडा | अंक : ८
दिवसाच्या उत्तरार्धात विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. आज भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळाल.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यावी.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ४
आज सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. प्रामाणिक प्रयत्नांस यश नक्की.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser