आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज 12 पैकी सहा राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते

रविवार, 31 मे रोजी 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : २

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता| अंक : ७

आवक मनाजोगती असल्याने आज तुमची मन:स्थिती उत्तम राहील. मनासारखी हौसमौज करता येईल. प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

आज दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ९

आज रिकाम्या गप्पा टाळा, कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

व्यवसायात स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

टेलिफोन-लाइट बिले भरावी लागणार आहेत. काही देणी चुकवावी लागणार आहेत. वाद टाळलेले बरे.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. गृहिणी हसतमुख असतील.

धनू : शुभ रंग : क्रीम| अंक : २

मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल.

मकर : शुभ रंग : लाल| अंक : ४

नवे उपक्रम उद्यावर ढकलेत तर बरे. आज शासकीय कामे रखडणार आहेत. आज देव मात्र नवसाला पावेल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.पत्नी मोलाचे सल्ले देईल.

बातम्या आणखी आहेत...