आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 4 एप्रिलचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
दैनंदिन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढतील. येणी वसूल होतील.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकललेले बरे. संध्याकाळी वाहन चालवताना गाणे गुणगुणू नका.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
उद्योग धंद्यातील स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल.नोकरदारांना ऑफिसमधे साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. भागीदारांशी सलोखा राहील.

कर्क : शुभ रंग : मरून| अंक : १
नोकरदारांना कामाचा ताण वाढेल. आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. संध्याकाळी सत्संगात रमाल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वत:चा स्वार्थ साधून घ्याल. आज तुम्ही जरा मौजमजेस प्राधान्य द्याल.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २
कुटंुबीयांमधे प्रेम वृद्धिंगत होईल. मुले अभ्यासास प्राधान्य देतील. कलाकारांना स्ट्रगल करावा लागेल.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
कोर्ट कचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ८
प्रकृती ठणठणीत असल्याने आज कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

धनू : शुभ रंग : लाल| अंक : ५
एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू देऊ नका.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर जाईल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
उद्योग व्यवसायात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमी भासणार नाही.

मीन : शुभ रंग : पांढरा|अंक : ९
प्रतिष्ठितांच्या ओळखी कामी येतील. नोकरी धंद्यात उत्साही दिवस राहील. मित्रांस मदत करावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल.

बातम्या आणखी आहेत...