आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 5 जुलै रोजी एक खास शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऐंद्र नावाचा योग जुळून येत असल्यामुळे जवळपास संपूर्ण दिवस शुभ काम केले जाऊ शकतात. बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : ६

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवची हमखास साथ मिळेल. श्रध्दाळूंना उपासनेचे फळ मिळेल.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

कर्क :  शुभ रंग : मरून | अंक : ८

खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ९

पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ६

आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

ज्येष्ठ मंडळी  तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही. 

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४

कार्यक्षेत्रात   स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण कराल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना  मदत कराल.

धनू :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

तुमच्याकडून आज काही चुकीचे निर्णय घेतले जातील. आज स्वत:चेच  खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. 

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणासाठी खर्च करावा लागेल. स्वार्थासाठी  गोड बोलाल.  

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ३

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. 

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : १

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. ध्येय साध्य होतील.

बातम्या आणखी आहेत...