आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 5 जून रोजी आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती व्याघात नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : भगवा| अंक : २
रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर रहाल. आज कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल.

वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. वाद विवाद टाळलेले बरे. आज मुलांचे मस्तीचे प्रमाण वाढेल.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : १
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील बघतील.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करायला आज दिवस उत्तम आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज तुम्ही कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्चावर ताबा ठेवायला हवा.

कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अती धावपळ टाळा. आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.

तूळ : शुभ रंग : डाळींबी| अंक : १
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज प्रत्येक कामांत उत्साह राहील. सकारात्मकता वाढेल.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीत साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. प्रतिकूल दिवस.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनी नैराश्य येण्याची शक्यता. आज महत्वाच्या चर्चा व बैठकी टाळलेल्याच बऱ्या.

मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज पत्नीचे मूड सांभाळाल.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. आज व्यसनांपासून दूर रहा.

मीन : शुभ रंग : मारपंखी| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. विरोधकांचा विरोध मावळेल.

बातम्या आणखी आहेत...