आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 6 डिसेंबर रोजी आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : ३
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केलेत तर यशाचा मार्ग सोपा होईल. आज गृहसैख्याचा दिवस.

वृषभ: शुभ रंग : मरून| अंक : १
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. सामाजिक कामे करणाऱ्यांना समाजात आदर मिळेल. यशदायी दिवस.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : २
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. इच्छापूर्तीचा दिवस.

कर्क : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. येईल. जोडीदारास दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

सिंह :शुभ रंग : आकाशी| अंक : ५
हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.दिवस लाभाचा असून अवघड कामे सोपी होतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा|अंक : ४
आपल्या कतृत्वास थोरामोठयांचे अशिर्वाद लाभतील.गृहीणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा|अंक : ५
प्रयत्नांस प्राधान्य देणे गरजेचे राहील. श्रमसाफल्याचे समाधान मिळणार आहे. दैव तुमच्याच बाजूने आहे.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
वैवाहीक जिवनांत किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरु नका. सासूरवाडीकडून काही लाभ होतील.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
इतराच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा. प्रवासात खोळंबा होईल

कुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ९
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न रहाता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : ६
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.मुले आज्ञेत असतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser