आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 6 नोव्हेंबर रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
भावनेच्या भरात कुणाला कसलीही वचने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या. आज आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे.

वृषभ | शुभ रंग :निळा, शुभ अंक : २
कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या प्रभावात असतील. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या.

मिथुन | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ९
आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमच्या अधिकारात वृद्धी होईल. एखादी वाढीव जबाबदारीही स्वीकारावी लागेल.

कर्क | शुभ रंग :आकाशी, शुभ अंक : १
आज हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल, पण तसे करू नका. प्रलोभने टाळा, संयम ठेवा. नाेकरी- धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल.

सिंह | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
आजचा दिवस उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींनी मन:शांतीसाठी सत्संगाकडेच वळावे.

कन्या | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. व्यवसायात भागीदारांशी सामंजस्याचे वातावरण राहील

तूळ | शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ८
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नींमधील मतभेद सामंजस्याने सुटू शकतील.

वृश्चिक | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाचीही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न चुटकीसरशी सुटतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साहपूर्ण दिवस.

धनु | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ३
व्यापार-उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावराची खरेदी-विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

मकर | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ९
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. आज घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

कुंभ | शुभ रंग :मरून, शुभ अंक : ६
दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग टाळावी.

मीन | शुभ रंग :निळा, शुभ अंक : ७
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. तुमच्यातील मीपणा वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...