आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आजच्या दिवसाची सुरुवात

रविवार 7 जून रोजी मूळ नक्षत्रामुळे शुभ नावाचा खास योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळखी  होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर रविवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : १

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

कर्क :  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६

आज अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल.  विद्यार्थ्यांना  एखाद्या  अवघड विषयात गोडी वाटेल.

कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ५

कौटुंबिक जिवन समाधानी असेल. तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवाल. आईचे मन जपाल.  

तूळ : शुभ रंग : हिरवा  | अंक : ९

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम  | अंक : ७

दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारतील. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागतील.

धनू :  शुभ रंग : निळा  | अंक : ८

यश हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. आवक  पुरेशी असेल. बचतीस प्राधान्य देणे गरजेचे.

मकर : शुभ रंग : मोरपंखी  | अंक : ४

आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. प्रवास घडतील. 

कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

बातम्या आणखी आहेत...