आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 7 मार्च रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

वृषभ : शुभ रंग : निळा| अंक : ४
आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. आज वाहन काळजीपूर्वक चालवा.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. चंगळवादी वृत्ती राहील. आज दोघांत तिसरा नको. आज ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हे धोरण योग्य.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : १
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नास यश निश्चित.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : २
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. काही गुपिते उघड होतील.

कन्या : शुभ रंग : क्रीम|अंक : ७
अाज अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

धनू : शुभ रंग : पांढरा|अंक : ९
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
आज स्वार्थाकडे लक्ष असुद्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ७
नवीन लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : ५
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.

बातम्या आणखी आहेत...