आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 7 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : २
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. मुले अज्ञा पाळतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही.

कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : ३
प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवणे हिताचे. कायद्यात रहा.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
थोडी मानसिक अस्वस्थता वाटेल. काही महत्वाची मेल्स येतील. दुपरानंतर जवळपासच्या प्रवासास निघाल.

कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठीत मंडळींच्या सहवासात रमाल.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकाल. आज कुठेही तुमची मर्जी चालेल. हरवलेले गवसेल.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ८
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज नोकरीधंद्यात अत्यंत उत्साही वातावरण राहील. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. सुवार्ता येतील.

कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ९
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

बातम्या आणखी आहेत...