आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 8 ऑगस्ट रोजी पुष्य नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : मोतिया | अंक : २
चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना ग्लॅमर मिळेल.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलूनच स्वार्थ साधून घ्यावा.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील.आशादायी दिवस.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्यावे.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

कन्या : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ६
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : ५
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : २
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ३
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावा लागणार आहे.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक :४
कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आनंदी दिवस.

बातम्या आणखी आहेत...