आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 8 मे रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती गंड नावाचा योग तयार करत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. रविवारच्या या अशुभ योगामुळे 7 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : केशरी | अंक : ३
वाहन वास्तू खरेदी विषयी रखडलेली कामे मार्गी लागतील. आज तुम्ही गरजूंना आपणहून मदत कराल.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : २
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : २
आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. क्षुल्लक वाद विवादाचे प्रसंग उद्भवतील. आज मनावर ताबा ठेवा.

सिंह : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज दुनियादारी करण्यापेक्षा स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष असुद्या. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
पैशाची कमतरता जाणवणार नाही. आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेऊ शकाल. योग्य माणसे संपर्कात येतील.

वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ९
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.

धनु : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
शारिरीक कष्ट करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

मीन : शुभ रंग : लाल | अंक : १
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना चैन करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...