आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्यासाठी राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 9 जानेवारीचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
जमाखर्चाचा मेळ बसवताना नाकी नऊ येतील. परदेशाशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
कार्यालयीन कामासाठी अनपेक्षित प्रवास संभवतात. पैसा कातीही आला तरी पुरणार नाही. वाद टाळावेत.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
एखादा अनपेक्षित लाभ संभवतो. आज ईच्छापूर्तीचा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
आज कामाच्या ठीकाणी काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. आज वडीलांनी दिलेले सल्ले डावलू नका.

सिंह : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
महत्वाच्या कामांना विलंब होईल. तरूणांनी कुसंगत टाळावी. ज्येष्ठांना सत्संगातुनच मन:शांती मिळेल.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
कंटाळवाणा दिवस, कामाचा डोंगर वाढत जाईल. मोफत सल्लागार मंडळी भलतेच बोअर करतील.

तूळ : शुभ रंग : केशरी| अंक : २
ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. आज घरी पत्नी आतुरतेने वाट पहात असेल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ८
नोकरदारांना आज ओव्हर टाईम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागेल.

धनु : शुभ रंग : आकाशी | अंक : १
रसिक मडळी जिवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणे फुलतील, बहरतील. आरोग्य उत्तम साथ देईल.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
कितीही पैसा आला तरी कमीच पडेल. मुलांचे लाड आवरते घ्या, त्यांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होइल.मातोश्रींशी काही मतभेद संभवतात. व्यस्त दिवस.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : ५
आज काही येणी असतील तर वसूल होतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.