आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुध वक्री, आता 17 तारखेला सूर्याचे राशी परिवर्तन:बुद्धादित्य योगाने नोकरी-व्यवसायात होईल लाभ

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधाची चाल बदलल्यानंतर या आठवड्यात सूर्याचे राशी परिवर्तन होईल. यामुळे सूर्य आणि शुक्राची युती समाप्त होईल आणि बुधादित्य शुभ योग बनेल. सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव, प्रसिद्धी देणारा शुक्र ग्रह आणि ग्रहांचा राजकुमार म्हटल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे हे परिवर्तन ऋतू बदलाचे संकेत देत आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहांच्या या बदलामुळे पुढील काही दिवस देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

कशी राहील ग्रहांची स्थिती
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांनी सांगितले की, 8 सप्टेंबरला बुध स्वतःच्या राशीत म्हणजेच कन्या राशीत अस्त झाला होता. यानंतर 10 तारखेपासून तो वक्री झाला आहे. त्याच वेळी, सूर्य देखील त्याच्या स्वतःच्या सिंह राशीत शुक्र ग्रहाबरोबर युती करत आहे. परंतु या आठवड्याच्या शेवटी 17 तारखेला सुर्याचे राशी परिवर्तन होईल आणि हा ग्रह कन्या राशीमध्ये बुधासोबत बुधादित्य योग तयार करेल. हा एक शुभफळ देणारा संकेत आहे. याच्या प्रभावाने देशात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल होतील.

षडाष्टक योग संपेल
सूर्याच्या राशी बदलामुळे शनिसोबत तयार होत असलेला अशुभ षडाष्टक योग संपुष्टात येईल. ज्याचा प्रभाव देश आणि जगासह सर्व राशींवर दिसून येईल. त्यामुळे लोकांना तणावातून आराम मिळू लागेल. वादही मिटतील. अपघात आणि आजार होण्याची शक्यता कमी होईल. नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. मोठे निर्णय होतील. यासोबतच काही लोकांची जागा बदलण्याचीही शक्यता आहे.

बुधादित्य योगाने शुभ काळ सुरू होईल
सूर्य कन्या राशीमध्ये मित्र ग्रह बुधसोबत आल्याने बुधादित्य योग तयार होईल. हा शुभ योग अनेक लोकांसाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे नोकरी-व्यवसायात बढती मिळण्याची शक्यता आहे. थांबलेले पैसे तुम्हाला मिळतील. पद आणि मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता राहील. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील. या शुभ योगाच्या प्रभावामुळे अनेकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...