आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतासह जगभरातल्या अनेक देशांनी २०२० वर्षातील पहिले सूर्यग्रहण बघितले. भारतात सकाळी ९.१५ वाजता सूर्यग्रहण सुरू झाले आणि दुपारी ३.०४ वाजता ते संपले. जवळपास ३ तासांपर्यंत सूर्यावर चंद्राची छाया पडली हाेती. कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी १०.२५ वाजता सुरू झाले. या काळात सूर्य ३० सेकंद कंकणाकृती स्थितीत हाेता आणि सूर्याचा गाेल चकाकत्या अंगठी सारखा दिसला. या अगाेदर २६ डिसेंबर २०१९ मध्ये दक्षिण भारत कंकणाकृती आणि देशाच्या विविध भागात अंशत: ग्रहण दिसले. पुढील कंकणाकृती सूर्यग्रहण भारतामध्ये २१ मे २०३१ राेजी बघायला मिळेल तर २० मार्च २०३४ राेजी पूर्ण सूर्यग्रहण हाेईल, पण ते दक्षिण अमेरिकेत बघायला मिळेल.
सूर्यग्रहणात या झाल्या विशेष गाेष्टी
- आफ्रिकेतील कांगाे, सुडान, इथिआेपिया, येमेन, साैदी अरब, पाकिस्तान आणि चीनमध्ये सूर्यग्रहण दिसले. भारतात दुपारी १२.०८ ही ग्रहणाची अत्युच्च पातळी हाेती.
- देशात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने ग्रहण थाेडावेळ दिसले व नंतर ढगात लपले
- ग्रहणात काळाेख झाल्याने केवलादेव राष्ट्रीय उद्यानात (भरतपूर, राजस्थान) बहुतांश पक्षी घरट्याकडे परतले. पण ग्रहण संपल्यावर त्यांनी पुन्हा भरारी घेतली.
- राजस्थानच्या अजमेरमध्ये ग्रहण बघताना एक १५ वर्षांची मुलगी छतावरून पडली. तिचा विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.