आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

16 जुलैला सूर्याचे राशी परिवर्तन:एक महिना कर्क राशीत राहील सूर्य, मेष, वृष, मिथुनसहित 9 राशींसाठी शुभ राहील सूर्याची स्थिती 

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंह, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सूर्याच्या स्थितीमुळे राहावे सतर्क

गुरुवार 16 जुलैपासून ग्रहांचा राजा सूर्य राशी बदलून मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. यानंतर हा ग्रह 17 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र असून हा सूर्याचा मित्र ग्रह आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, सूर्य राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. येथे जाणून घ्या 12 राशींवर कसा राहील सूर्यदेवाचा प्रभाव...

मेष

या राशीसाठी सूर्य चौथा राहील, यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी समाप्त होऊ शकतात.विविध लाभ होतील.

वृषभ

तुमच्यासाठी सूर्य तिसरा राहील. ही स्थिती लाभदायक राहील. वाहन सुख मिळू शकते. कुटुंब आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

मिथुन

या राशीसाठी दुसरा सूर्य समस्या दूर करणार ठरेल. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल कराल. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात.

कर्क 

सूर्य सध्या याच राशीमध्ये राहील. हा काळ शुभ राहील. एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. कामामध्ये बढती मिळेल.

सिंह 

या राशीच्या लोकांसाठी सूर्य बारावा राहील. यामुळे काही अडचणी वाढू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कन्या

अकरावा सूर्य तुमच्या बाजूने राहील. धनामध्ये वृद्धी होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मन लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ

दहावा सूर्य या राशीच्या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ करणारा राहील. मित्रांसोबत वाद होऊ शकतात. धैर्य बाळगण्याची आवश्यता आहे.

वृश्चिक 

या राशीसाठी नववा सूर्य कामामध्ये बदल करून देणारा राहील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. मित्रांच्या मदतीने मोठा फायदा होऊ शकतो.

धनु

तुमच्यासाठी सूर्य आठवा राहील. एखाद्या मोठ्या कामामध्ये यश मिळण्याचे योग जुळून येत आहेत. खर्चामध्ये वाढ होऊ शकते परंतु धनही मिळेल. व्यापारात यश प्राप्त होईल.

मकर

या राशीच्या लोकांसाठी सातवा सूर्य शुभफळ प्रदान करेल. मोठी योजना यशस्वी होऊ शकते. कामाचा विस्तार वाढू शकतो. अधिकाऱ्यांची मदत मिळेल.

कुंभ

या राशीच्या सूर्य सहवा राहील. यामुळे चिंता वाढवणारा हा काळ राहू शकतो. कुटुंबात शांतता राहील. जबाबदारी वाढेल. नोकरीत धैर्य बाळगावे.

मीन

तुमच्यासाठी सूर्याची पाचवी स्थिती चांगली राहील. एखादे मोठे काम करण्यात यश प्राप्त होईल. मित्रांमुळे लाभ होऊ शकतो.