आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 10 मार्चला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. आज प्रवास कंटाळवाणे होतील.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करायला आज दिवस उत्तम. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज तुम्ही कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्चावर ताबा ठेवा.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अती धावपळ टाळा. आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.

सिंह : शुभ रंग : डाळींबी| अंक : १
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज प्रत्येक कामांत उत्साह राहील. सकारात्मकता वाढेल.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे. देव नवसास पावेल.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही आज नैराश्य येईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. पत्नीच्या लहरी सांभाळाल.

धनु : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. व्यसनांपासून दूरच रहा. काही येणी असतील तर वसूल होतील.

मकर : शुभ रंग : मारपंखी| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. विरोधकांचा विरोध मावळेल.

कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : २
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर रहाल.

मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना मनस्ताप देतील. डोके शांत ठेवणे गरजचे. मुलांचे मस्तीचे प्रमाण वाढेल.

बातम्या आणखी आहेत...