आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात
Advertisement
Advertisement

गुरुवार 11 जून रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : तांबूस | अंक : ९

व्यवसायात यश दृष्टीक्षेपात येईल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. आज छान दिवस.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

नोकरदारांना आज दडपणाखाली काम करावे लागेल. नोकरीच्या ठीकाणी फक्त आपल्या वाटयाचे काम करा.कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी. शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ८

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ७

वैवाहीक जिवनात मधुरता राहील. घरात अधुनिक सुखसोयींसाठीखर्च कराल. आज चैन कराल.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ५

आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

आवक पुरेशी असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : २

मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागेल. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज काही देणी चुकवावी लागतील.

Advertisement
0