आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 11 मार्च रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज शिव पूजेचा खास दिवस महाशिवरात्री आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : १
कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ८
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.

कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आनंदी असा आजचा दिवस. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ४
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी चालून येतील. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. यश आता सोपे होईल. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आज पैशाची कमतरता भासणार नाही. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. भटकंतीस यश येईल. आज भावंडांमध्ये सामंजस्य राहील.

धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९
कुटुंबात समाधानी वातावरण असल्याने घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल.

मकर : शुभ रंग : मरून | अंक : ७
चैनी व विलासी वृत्ती बळावेल. शिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय उत्तम चालतील.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

बातम्या आणखी आहेत...