आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 13 जानेवारी रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजचे ग्रह-तारे शुभ नावाचा खास योग तयार करत आहेत. या योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी विशेषतः 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आपक पुरेशी असली तरी खर्च जपून करा कारण दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च दार ठोठावतील.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आज काही प्रिय पाहुणे घरी पायधूळ झाडतील. अती स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेऊन गोड गोड बोला.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
खर्चाचे प्रमाण वाढले असले तरी काळजी नको. काही जुनी येणीही वसूल होण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : २
काही कारणाने दूरावलेले मित्र जवळ येतील. नोकरीत बढतीच्या प्रतिक्षेत असाल तर गुड न्यूज.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. गृहीणी दानधर्म करतील.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ४
मन काहीसे चंचल राहील. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. गैरवर्तन टाळा, प्रतिष्ठेस जपा.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ५
आज एखादी गुप्त बातमी समजणार आहे. गृहीणींनी आज झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आज वाद टाळावेत.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : १
कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना ग्रिन सिग्नल आहे.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : २
मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. आज संततीकडून सुवार्ता येतील.

मीन : शुभ रंग : चंदेारी| अंक : २
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमान वाटण्याजोगी एखादी कामगिरी कराल.

बातम्या आणखी आहेत...