आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 14 जानेवारीला श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे उत्तरायण सुरु होत आहे. आजपासून वसंत ऋतू सुरु होतो. यामुळे मकरसंक्रांतीला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आजची ग्रहस्थिती 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील. नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग: क्रिम| अंक : ९
नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. मित्र दगा देतील.

वृषभ: शुभ रंग: तांबडा| अंक : १
नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. शासकिय कामे रखडतील. आज सहज काही साध्य होणार नाही पण तुमच्या प्रयत्नांस दैवाची साथ नक्की लाभेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागेल.काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील. वैवाहीक जिवनांत जोडीदारही आपल्याच मतावर अडून बसेल.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. इगो दुखावेल.

सिंह :शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. वैवाहिक जिवनात सकाळचे मतभेद संध्याकाळ पर्यंत मिटतील.

कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. आज भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळाल.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ६
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. लेखकांना लिखाणे प्रसिध्द होतील.

धनु : शुभ रंग : केशरी| अंक : ४
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. गायक मंडळींना आज रसिकांकडून वन्स मोअर मिळेल.

मकर : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
आज स्वत:चे लाड पुरवाल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे आज धोरण असणार आहे.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
गैरसमजाने दुरावलेले नातलग जवळ येतील. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील. इच्छापूर्ती होईल.

बातम्या आणखी आहेत...